खरेच मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजासाठी काय केले ?
*मंत्री संजयभाऊ राठोड यांचेवर प्रश्न निर्माण करणा-यांच्या माहितीकरीता.*
बंजारा आरक्षणाचे पार्श्वभूमीवर एका बंजारा बांधवाने काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न.
प्रश्न:- *“आरक्षणासाठी समाज रस्त्यावर आहे, आंदोलन तापले आहे, तुम्ही कुठे गायब आहात ?”*
सर्वप्रथम ही बाब लक्षात घेतली पाहीजे की, कोणताही मंत्री हा प्रत्यक्षात आंदोलनात उतरत नसतो. तो शासनाचा प्रतिनिधी असतो.मराठा आरक्षणात राधाकृष्ण वि खे पाटील यांनी जी भूमिका घेतली तीच ना संजय राठोड बंजारा आरक्षण मुद्यावर घेत आहेत.मंत्रिमंडळात काम करणाऱ्या समज परातिनिधीने समाज आणि शासन यामध्ये दुवा म्हणून काम करणे अपेक्षित असते.तसेच बंजारा समाजाची अनुसुचित जमातीची आरक्षणाची असलेली मागणी फार जुनी असून, हैद्राबाद गॅझेट लागू केल्याने तिला भक्कम आधार मिळाला आहे. आपल्या समाजाचे मंत्री संजय राठोड हे *सातत्याने समाजाला ONE NATION, ONE CATEGORY, ONE RESERVATION* ची भूमिका राज्य व देशपातळीवर मांडत आलेले आहे. एव्हढेच नव्हेतर बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व इतर मंत्री मंडळातील सदस्यांसमोर बंजारा समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याबाबतची (ONE CATEGORY) मागणी सातत्याने केली आहे याचे समाज घटकातील बहुतांश लोक साक्षीदार आहेत.
प्रश्न:- हैद्राबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळू शकतो काय ?*
याअनुषंगाने समाजाचे सजग आणि तत्पर नेतृत्व मा. संजयभाऊ राठोड साहेबांनी स्वत: पुढाकार घेवून दि.8/9/2025 रोजी मुंबई येथे समाजातील सर्व महंत, नेते, विविध संघटनाचे पदाधिकारी, अभ्यासक यांचे समवेत विचारमंथन बैठक घेतली. सदर बैठकीतून अभ्यासकांकडून तो विषय समजून घेतला. तसेच त्यावेळी त्यांनी हा विषय अत्यंत महत्वाचा असून, याकरिता अराजकीय सर्व मान्य कृती समिती असावी अशी भूमिका मांडली. जर एखाद्या आंदोलनाला राजकीय वळण लागले तर त्याला पाहिजे त्याप्रमाणात यश मिळू शकत नाही याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे.
जर आपण श्री. मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलनाचा अभ्यास केला तर आज जवळपास 70 टक्के नेते मराठा समाजाचे आहेत. तसेच मंत्री मंडळात सुध्दा मोठया प्रमाणात आहेत. जसे की, सर्वश्री एकनाथ शिंदे, शरद पवार, अजितदादा पवार, नारायण राणे, अशोक चव्हाण, चंद्रकांत दादा-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील असे अनेक मान्यवर असून सुध्दा त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनाचे नेतृत्व न करता अप्रत्यक्षरित्या (न कळत) बाहेरुन पाठींबा देत मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे यशस्वी आंदोलन केले. त्यामुळे वरील दि.8/9/2025 रोजी झालेल्या बैठकीतून संजयभाऊ राठोड यांचीही भूमिका अशीच असल्याची दिसून येते.
प्रश्न :- *“संजय राठोड साहेब, तुम्ही स्वार्थासाठी महाराष्ट्रभर दौरे केले – ते समाजासाठी होते की स्वतःचं मंत्रीपद वाचवण्यासाठी ?*
न थकता, न थांबता सातत्याने समाजासाठी काम करणारा नेता म्हणून ना संजय राठोड यांची ओळख आहे. (ते मंत्री असो किंवा नसोत.) भारतात राहणारा बंजारा समाज जरी हा विविध आरक्षणाच्या प्रवर्गात, विविध नावाने विभागला असला, तरी तो एकच आहे, हीच भूमिका घेवून संजयभाऊ राज्य व देशपातळीवर दौरे करीत असतात. त्यामुळे समाजाला ONE NATION, ONE CATEGORY, ONE RESERVATION मिळावे ही भूमिका सातत्याने घेत आहेत. एव्हढेच नव्हेतर *महसूल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली* नेमण्यात आलेल्या इतर मागासवर्ग करिता नेमण्यात आलेल्या *मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये संजयभाऊ राठोड हे सुध्दा सदस्य आहेत. मंत्रीमंडळ समितीच्या पहिल्याच बैठकीत बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे अशी मागणी केली*. तसेच बंजारा कृती समितीचे निवेदन सुध्दा समितीच्या अध्यक्षांना देवून समाजाची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविली. त्यामुळे समितीच्या अध्यक्षांनी तात्काळ दखल घेवून,व निवेदनावर लेखी शेरा देऊन, सचिव, इतर मागास बहुजन कल्याण यांना निवेदन पाठविले.
तसेच छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली सन 2020 मध्ये मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये संजयभाऊ राठोड हे सदस्य होते. या समितीने बंजारा समाजाचे अनुषंगाने काही महत्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. जसे की,
• *वि.जा. (अ) आणि भ.ज. (ब) या मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करणे.*
• *वि.जा.(अ), भ.ज. (ब), भ.ज. (क) व भ.ज. (ड) यामधील अंतरपरिवर्तनीयेचा नियम रद्द करणे.*
या शिफारशीच्या अनुषंगाने विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली, असे दि.10/09/2025 रोजीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत संजयभाऊ राठोड यांनी स्पष्ट शब्दात विचारले. तसेच पुढच्या बैठकीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या.
प्रश्न:- *तुमच्या भ्रष्टाचाराचे व इतर कारणामे डाग उघड होऊ नयेत म्हणून तुम्ही समाजाच्या नावाचा उपयोग केला का?* *की फक्त समाजाच्या नावावर राजकारण करून सत्ता उपभोगण्यासाठी हा खेळ केला?* *आज समाज तुम्हाला याचं उत्तर विचारतोय!”*
•
समाजाचे दैवत स्व वसंतराव नाईक साहेब व स्व सुधाकरराव नाईक साहेब यांनी बंजारा समाजासाठी मोठे कार्य केले.यांच्या नंतर समाजाच्या विकासासाठी संजयभाऊ हे कार्य करीत आहेत.मंत्री संजयभाऊ राठोड यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बंजारा समाजाची काशी असलेले श्रध्दास्थान पोहरादेवी-उमरीचा विकास होतांना दिसत आहे ही आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच पोहरादेवी येथे उभारण्यात येत असलेल्या *संत सेवालाल महाराज इमारतीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट इमारतीचा पुरस्कार* प्राप्त झाला आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. *धार्मिक स्थळाचा विकास म्हणजे समाजाचा विकास नव्हे ही बाब कायमची लक्षात ठेवता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संजयभाऊंच्या प्रयत्नामुळे नक्कीच काही महत्वपूर्ण निर्णय मागील काळात समाजासाठी झाले आहेत*. जसे की,
• संत सेवालाल महाराज यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करणे.
• गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापना
• बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत योजनेच्या धर्तीवर वसंतराव संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)
या वरील योजनेमुळे SC, ST, मराठा, OBC वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून *हजारो विद्यार्थ्यांचे IAS,IPS व इतरही मोठ्या पदावर विराजमान होण्याचे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. वानर्टी संस्थेमुळे आपल्याही समाजातून मोठे अधिकारी घडायला मदत होणार आहे*.. हे ही लक्षात घेतले पाहिजे.
• नवी मुंबई समाजासाठी जागा मिळवून त्याठिकाणी सेवाभवन बांधण्यात येणार.
• वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे समाजातील हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकत नाही. संजय भाऊ बंजारा समाजातील सामान्य कुटुंबातून आलेले असल्याने त्यांना ही बाब माहिती होती. त्यामुळेच सातत्यपूर्ण पाठपुरावा करून स्वाधार योजनेच्या धर्तीवर सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार आहे. जेवढी मदत SC, ST विद्यार्थ्यांना होते, तेवढीच आपल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
• गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळ व सानुग्रह अनुदान योजना
• जिल्हयाच्या ठिकाणी मुलां-मुलींसाठी 72 शासकीय वसतिगृहे सुरु.
• ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींसाठी 82 शासकीय वसतिगृहे सुरु.
• परदेशी शिक्षणासाठी दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
• संत सेवालाल महाराज समृध्दी योजना या माध्यमांतून तांडयामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन होणार आहे.
तांड्यात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी असलेली सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन गावामध्ये असलेली 3 किमी अंतराची अट... कुठेही मंत्रिमंडळ प्रस्तावात अंतर शिथिल करणे नसतानाही, *सर्वांना विरोध करून अंतराची अट रद्द करायला भाग पाडले*.. त्यामुळेच आज तांड्यात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेला वेग आला आहे..
• स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या बंजारा समाजातील 1000 मुलां-मुलींसाठी आपल्या आईच्या नावाने *मातोश्री प्रमिलादेवी दुलिचंद राठोड शिष्यवृत्ती योजना*..स्वतंत्र वैयक्तिक योजना सुरू केली.
यामाध्यमातून समाजातील *विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्य व आर्थिक* मदत होणार आहे. अशी कोणत्याही समाजासाठी एखाद्या राजकीय व्यक्तीने सुरू केलेली पहिली आणि एकमेव योजना आहे..
• वरील सर्व योजना मंजूर करणे/सुरु होणे, हे संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नांचेच फलित आहे. *या सर्व बाबींमधून बंजारा समाजाचा फायदा होणार आहे. ना की संजयभाऊ राठोड यांचा फायदा होणार आहे*. त्यामुळे टिका-टिपण्णी करणा-यांनी या सर्व बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. उगाच काहीतरी लिहायचे म्हणून लिहू नये आणि समाजात संम्रभ निर्माण करु नये.
प्रश्न:- *मुंबईत आरक्षणाबाबत बैठक घेऊन तुम्ही समाजाला आश्वासन दिलं होतं – मग आज समाज आंदोलन करत असताना तुम्ही गायब का आहात ?*
*याअनुषंगाने आपल्या समाजाचे संवेदनशील नेते मा. संजयभाऊ राठोड साहेबांनी स्वत: पुढाकार घेवून दि.8/9/2025 रोजी मुंबई येथे समाजातील सर्व महंत, नेते, विविध संघटनाचे पदाधिकारी, अभ्यासक यांचे समवेत बैठक घेतली. सदर बैठकीतून अभ्यासकांकडून तो विषय समजून घेतला. तसेच त्यावेळी त्यांनी हा विषय अत्यंत महत्वाचा असून, याकरिता अराजकीय सर्व मान्य कृती समिती असावी अशी भूमिका मांडली. जर एखाद्या आंदोलनाला राजकीय वळण लागले तर त्याला पाहिजे त्याप्रमाणात यश मिळू शकत नाही याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे.*
*प्रश्न:- आरक्षण मिळवून देण्याबाबत तुम्ही सरकारशी नेमकी कोणती पावलं उचललीत? त्याचा खुलासा आजपर्यंत का केला नाही?*
- ज्यावेळी मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू झाला. त्यानंतरच्या मंत्रीमंडळ बैठकीत संजयभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री महोदय यांना बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करावा, अशी भूमिका घेतली. तसेच सातत्याने ते मुख्यमंत्री महोदय यांचेकडे पाठपुरावा करीत आहेत. लवकरच मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बंजारा समाजाचे शिष्टमंडळाची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहे.आज बहुतेक त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याचे सुद्धा कळतेय.
तसेच महसूल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या इतर मागासवर्ग करिता नेमण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये संजयभाऊ राठोड हे सुध्दा सदस्य आहेत. मंत्रीमंडळ समितीच्या पहिल्याच बैठकीत बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. तसेच बंजारा कृती समितीचे निवेदन सुध्दा समितीच्या अध्यक्षांना देवून समाजाची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविले. त्यामुळे समितीच्या अध्यक्षांनी तात्काळ दखल घेवून सचिव, इतर मागास बहुजन कल्याण यांना निवेदन पाठविले
प्रश्न:- आरक्षण कोणत्या मार्गाने मिळणार – न्यायालयीन, विधेयक, की केंद्राचा निर्णय ? समाजाला स्पष्ट उत्तर द्या!
*अनुसुचित जमातीचे आरक्षण देण्याचे संपूर्ण अधिकार हे केंद्र शासनाचे आहे. राज्य शासन याची फक्त शिफारस करु शकतो. राज्यशासनाकडून केंद्र शासनास शिफारस होण्याकरीता संजयभाऊ राठोड हे प्रयत्नशील आहे*.
*एवढयावर न थांबता न्यायालयीन मार्ग अवलंबविता येईल काय, यासाठी विविध कायदे तज्ज्ञांशी त्यांची चर्चा सुरु आहे. मंत्रालयातील विविध विभागाच्या सचिवांशी सुध्दा ते विचार विनिमय करीत आहे. तसेच इतरही काही मार्ग अवलंबविता येईल काय याचाही ते प्रयत्न करीत आहेत. समाज हा संजयभाऊ राठोड यांचा प्राण आहे. ते कायम समाजासोबत असतात आणि समाजासाठी वाटेल ते करण्याची त्यांची नेहमीच तयारी राहीली आहे.
प्रश्न:- *स्वतःचं मंत्रीपद जाऊ नये, स्वतःवरचे भ्रष्टाचाराचे व इतर डाग उघड होऊ नयेत म्हणून तुम्ही समाजापासून दूर तर पळ काढत नाही ना?*
- बंजारा समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे, याकरिता संजयभाऊ राठोड साहेबांनी स्वत: पुढाकार घेवून दि.8/9/2025 रोजी मुंबई येथे समाजातील सर्व महंत, नेते, विविध संघटनाचे पदाधिकारी, अभ्यासक यांचे समवेत बैठक घेतली. तसेच ते सातत्याने समाजातील अभ्यासकांच्या संपर्कात राहून पुढील रणनिती काय असावी यावर विचारमंथन करीत आहे. मंत्रीन ना संजय राठोड यांनी स्वत: एखाद्या आंदोलनामध्ये किंवा मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे हे कितपत योग्य आहे,याचीही अपेक्षा करतांना विचार करणे गरजेचे आहे.मंत्र्यांचे काम हे सरकार कडून काम करवून घेण्याचे आहे.
प्रश्न:- *आंदोलनकर्त्यांवर होणारा पोलिसांचा बडगा थांबवण्यासाठी तुम्ही हस्तक्षेप का करत नाही? हा अन्याय तुम्हाला दिसत नाही का?*
-लोकशाही मार्गाने आंदोलन, मोर्चे, उपोषण करणे याचे सर्वांना अधिकार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन त्यांच्या नियमानुसार कारवाई करतो. परंतू एखाद्या ठिकाणी एखाद्यावर चुकीची कारवाई झाल्यास त्याची खात्री करुन त्याला संजयभाऊ नक्कीच मदत करतील, हे आपणांस सर्वांना माहिती आहे.
प्रश्न:- *बंजारा समाजाने तुम्हाला नेते मानलं, पण नेता संकटात पाठीशी राहतो – मग तुम्ही मागे का हटला ?*
- बंजारा समाज हा अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची मागणी करीत आहे. यापूर्वी कित्येकवेळा संजयभाऊ यांनीही बंजारा समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी केली आहे. समाजासोबत खंबीरपणे पाठीशी आहे आणि राहणार हे दाखवून देण्यासाठीच दि.8/9/2025 रोजी मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत संजयभाऊ यांनी दाखवून दिलेले आहे. या बैठकीला जे उपस्थित होते, त्या सर्वांना हे ज्ञात आहेत.
प्रश्न:- *समाजात संभ्रम आणि अविश्वास वाढत आहे – याची नैतिक जबाबदारी तुम्ही घेणार का?*
समाजात कोणताही संभ्रम आणि अविश्वास नाही. समाजाची स्पष्ट आणि मुख्य एकच मागणी आहे की, बंजारा समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे. त्यामुळे उगाच अनावश्यकरित्या काहीतरी लिखाण करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करु नये.
प्रश्न:- मुंबईच्या बैठकीत दिलेलं आश्वासन फक्त समाजाला फसवण्यासाठी होतं का? रणनीती भरकटवण्यासाठी होती?
-समाजाने अराजकीय कृती समिती स्थापन करावी. या कृती समितीच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजाचा घटक म्हणून कृती समितीच्या सोबत असल्याचे ना संजय राठोड यांनी सांगितले आहे.आतापर्यंत यशस्वी झालेले सर्व आंदोलने पाहता ते अराजकीय असल्यास यश मिळण्याची मोठी संधी असते, हे मुंबईच्या बैठकीत संजयभाऊ यांनी आपल्या बोलण्यातून सांगितले आहे. परंतू संजयभाऊ यांनी प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित नाही, असे वाटते.
प्रश्न:- *महाराष्ट्रातील बंजारा समाजातील तरुण, पुरुष-महिला, शेतकरी रस्त्यावर उतरले – काहींनी प्राण दिले त्यांच्याशी तुम्ही संवाद का साधला नाही?*
-आतापर्यंत समाजातील चार तरुणांनी आरक्षणाकरीता आपले प्राण गमावले आहे. संजयभाऊ यांनी या तरुणांच्या कुटुंबियांतील सदस्यांशी तसेच स्थानिक प्रशासनासाठी सुध्दा संपर्क साधला आहे. तसेच मी आपल्या सर्वांसोबत ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही दिली आहे.
प्रश्न:- समाजाचा प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी गप्प बसलात का?
- यापूर्वीच वेळोवेळी संजयभाऊ यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे हे आपणांस सर्वांना ज्ञात आहे.
प्रश्न:- *जर खरंच तुम्ही समाजाच्या बाजूने असता, तर आज आंदोलनकर्त्यांसोबत दिसलात असता – तुम्ही कुठे आहात?*
-काही तरी संभ्रम निर्माण करण्यासाठीचे प्रश्न विचारत असल्याचे दिसून येते. एखादा मंत्री कसा काय आंदोलनामध्ये सहभागी होवू शकतो,याचा विचार करावा.मराठा आंदोलन यशस्वी झाले. त्यात महाराष्ट्र शासनातील किती मंत्री उपस्थित होते याचे देखील प्रश्न उपस्थित करण्याऱ्याने विचार करावा.
प्रश्न:- *तुम्ही म्हणालात “मी आरक्षण घेऊनच समाजापुढे जाईन” – मग आता दिलेल्या वचनाचं काय झालं ?*
-आरक्षणाबाबत संजयभाऊ यांनी वेळोवेळी त्यांची भूमिका मांडली आहे.आरक्षण मिळवणे ही एक दिवसाची बाबा नाही त्याला कायदेशीर स्वरून द्यावे लागते.
प्रश्न:- *समाजाच्या मागणीला ठोस कायदेशीर आधार देऊन सरकारसमोर मांडलं का ? की फक्त टाळाटाळ केली ?*
- अनुसुचित जमातीचे आरक्षण देण्याचे संपूर्ण अधिकार हे केंद्र शासनाचे आहे. राज्य शासन याची फक्त शिफारस करु शकतो. राज्यशासनाकडून केंद्र शासनास शिफारश होण्याकरीता संजयभाऊ राठोड यांचे प्रयत्न सुरु आहे.
एवढयावर न थांबता न्यायालयीन मार्ग अवलंबविता येईल काय, यासाठी विविध कायदे तज्ज्ञांशी त्यांची चर्चा सुरु आहे. मंत्रालयातील विविध विभागाच्या सचिवांशी सुध्दा ते विचार विनिमय करीत आहे. तसेच इतरही काही मार्ग अवलंबविता येईल काय याचाही ते प्रयत्न करीत आहेत.
प्रश्न:- समाजाला वारंवार आश्वासन देऊन पोहरादेवीला स्वतःसाठी बोलवले होते का?
- पोहरादेवी हे तिर्थक्षेत्र बंजारा समाजाची काशी असून, दरवर्षी लाखो समाजबांधव त्याठिकाणी दर्शनासाठी येतात. या तिर्थक्षेत्राचा विकास होणे त्यासोबतच समाजाच्या विकासाचे काही महत्वाचे प्रश्न मार्गी लागणे, हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे आतापर्यंत समाजाच्या विकासासाठी झालेल्या निर्णयाचे फलित संजयभाऊ यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे स्पष्ट लक्षात येते की, समाजाचा विकास हाच संजयभाऊ यांचा ध्यास आहे
प्रश्न:- *नॉन क्रिमिलियर व आरक्षण मिळून देऊ असे म्हणत तुम्ही दहा वर्षे काढले का?*
छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली सन 2020 मध्ये मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये संजयभाऊ राठोड हे सदस्य होते. या समितीने बंजारा समाजाचे अनुषंगाने काही महत्वपूर्ण शिफारशी डिसेंबर 2020 मध्ये केल्या होत्या. जसे की,
• वि.जा. (अ) आणि भ.ज. (ब) या मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करणे.
• वि.जा.(अ), भ.ज. (ब), भ.ज. (क) व भ.ज. (ड) यामधील अंतरपरिवर्तनीयेचा नियम रद्द करणे.
या शिफारशीच्या अनुषंगाने विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली, असे दि.10/09/2025 रोजीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत संजयभाऊ राठोड यांनी स्पष्ट शब्दात विचारले. तसेच पुढच्या बैठकीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या.
प्रश्न:- *पोहरादेवी व समाजाचा गैरवापर तुम्ही केला का ?
-संजयभाऊ राठोड हे दिग्रस, दारव्हा व नेर या यवतमाळ जिल्हयातील मतदार संघांचे आमदार आहेत. पोहरादेवी हे तिर्थक्षेत्र संजयभाऊ यांच्या मतदार संघाच्या क्षेत्राच्या बाहेरील वाशिम जिल्हयात आहे. परंतू ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे देणं लागतो. या भावनेनी त्यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्र व समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. याचेच फलित आजची पोहरादेवीची परिस्थिती, समाजासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक या अनुषंगाने मार्गी लागलेले प्रश्न होय.
प्रश्न:- * महाराष्ट्राच्या आरक्षणाचा पत्ता नाही आणि देशाला एक आरक्षणाची मागणी तुम्ही कोणाच्या आधारावर करता ?
-बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे किंवा देशपातळीवर एक समान आरक्षण असावे, यासाठी संजयभाऊ सतत प्रयत्नशील असल्याचे आपण वेळोवेळी पाहिलेले आहे.
प्रश्न:- *तुम्ही आतापर्यंत तीन मुख्यमंत्री महोदयांसोबत काम केलात केवळ समाजाचे विषय पुढे करून तुम्ही तुमची पोळी भाजली का
एखाद्या आमदाराला मंत्री करणे किंवा न करणे, हा त्या पक्षश्रेष्ठीचा अधिकार असतो. *परंतू मिळालेल्या संधीचे सोनं कसे करता येईल, हे त्या व्यक्तींवर अवलंबून असते. म्हणून संजयभाऊ यांनी मिळालेल्या संधीचे सोने करुन* पोहरादेवी-उमरी तिर्थक्षेत्राचा विकास व समाजाचे प्रमुख प्रश्न मार्गी लावले आहे.इतर प्रश्न मार्गी लावणे साठी ते प्रयत्न करीत आहेत.
संजयभाऊ याच्याबद्दल काहीही लिहीतांना किंवा भाष्य करतांना आपण अभ्यास करणे अपेक्षित आहे.समाज पूर्ण जाणतो.
Sanjay Rathod-संजय राठोड
Sanjay Rathod-आपला माणूस
Sanjay Rathod For Maharashtra
Sanjay Rathod FC
Sanjay Rathod - दिग्रस विधानसभा
Sanjay Rathod Samarthak
Sanjay bhau Rathod
Shital Sanjay Rathod
Damini Sanjay Rathod-दामिनी संजय राठोड